ईश्वरी राजेंद्र चिंचोळकर या विद्यार्थिनीची नागपूर मुलाखतीसाठी निवड
पारोळा (प्रतिनिधी) – ग्रामीण भागात अँड्रॉइड फोन सर्वांकडे उपलब्ध नसल्यामुळे तसेच covid-19 च्या काळात लाऊड स्पीकर द्वारे शिक्षण देण्याचा उपक्रम जिल्हा परिषद शाळा पारळा तालुका अकोट जिल्हा अकोला जून 2020 पासून चालू केले आहे.
प्रथम एज्युकेशन फौंडेशन मुंबई या संस्थेने जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा पारळा पंचायत समिती अकोट येथील लाऊड स्पीकरद्वारे शिक्षण या उपक्रमाची दखल घेऊन या संस्थेने नोडल ऑफिसर सुनील इंगळे यांनी दिलेल्या माहितीनुसार या शाळेत येता येता पाचवीमध्ये शिकत असलेली विद्यार्थिनी ईश्वरी राजेंद्र चिंचोळकर या विद्यार्थिनीची शाळे बाहेरची शाळा या उपक्रमांतर्गत आकाशवाणी केंद्र नागपूर यांनी मुलाखतीसाठी निवड करून 53 व्या भागात प्रसारित करण्यात आले आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता काळात कोरोना संक्रमण होऊ नये शाळा बंद पण शिक्षण सुरू या कारवाई नुसार ग्रामीण भागात अँड्रॉइड मोबाईल्स सर्वांकडे उपलब्ध नसल्यामुळे लाऊडस्पीकरद्वारे शिक्षण या उपक्रमाची निवड शाळेचे मुख्याध्यापक जय किशन दंदे, यांनी सुचवली सहभागी शिक्षक म्हणून ठाकरे, पळसपगार, अनकुरकार या उपक्रमामध्ये सहभागी आहेत.