रस्त्याच्या कडेला असणारा हातगाडीवाला बचावला
जळगाव (प्रतिनिधी) – जळगाव-औरंगाबाद महामार्गावरील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या समोर बुधवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास एक ट्रक उलटला . रस्त्याच्या बाजूला असलेल्या हातगाडी वाला बाल बाल बचावला.
याबाबत अधिक माहिती असी आज दि. ७ बुधवारी रोजी एमएच ३१ सीबी ९४२२ हा ट्रक चालक बाहेर आणत होता. या ट्रकमध्ये बरदान असल्याने रस्त्यावर ट्रक चढवत असतांना चालकाचा ताबा सुटल्याने अचानक ट्रक उलटला . यावेळी कडेला हातगाडी वर सफरचंद विक्रेता मुखतार शेख हा उभा होता. ट्रक त्याच्या अंगावर कलंडणार तेवढ्यात त्याने बाजूला उडी घेतली. शेख याने सतर्कता बाळगल्याने तो बालंबाल बचावला. अपघातानंतर ट्रकचालक घटनास्थळावरून पसार झाला. एमआयडीसी पोलिस स्टेशनचे सहाय्यक फौजदार रामकृष्ण पाटील व सहकारी घटनास्थळी पोहोचले. त्यांनी वाहतूक सुरळीत केली.