भडगाव (प्रतिनिधी) –गिरणा नदीला आलेल्या पुरात मोटारसायकलस्वार दोन जण वाहून गेल्याची घटना गिरड गावाजवळ घडली. यातील एकाचा मृतदेह उत्राणजवळ सापडला तर दुसर्याचा शोध मात्र सुरू आहे.
कासोदा येथील अयाजोद्दीन शफिउद्दीन हे जामनेर येथे कामानिमित्त गेले होते. परत येतांना त्यांच्या सोबत एक अनोळखी व्यक्ती होता. गिरडजवळ गिरणा नदी पुलावरून पुराचे पाणी वाहत होते, पाण्याच्या प्रवाहाचा अंदाज न आल्याने मोटारसायकलसह दोघे वाहून गेले. बर्याच वेळाने शोध घेतल्यानंतर उत्राण गिरणा नदीपात्रात अयाजोद्दीन यांचा मृतदेह आढळला. तर त्यांच्या सोबतच्या व्यक्तीच्या मृतदेहाचा मात्र पत्ता लागला नाही. दरम्यान, ही दुर्घटना बुधवारी सायंकाळी चारच्या सुमारास घडली.