डॉ.अभिषेक ठाकुर यांचे जास्तीत जास्त लोकांनी तपासणी करुन घेण्याचे आवाहन
हंबर्डी ता.यावल(प्रतिनिधी) – येथे सरकारतर्फे नुकतीच घोषणा केलेल्या माझे कुटुंब माझी जबाबदारी अभियान अंतर्गत सर्वेक्षण करण्यात आले. राज्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता रुग्ण अत्यावस्थेत पोहचण्याच्या आधीच त्यांचे निदान व्हावे म्हणुन प्रशासनातर्फे अनेक उपायोजना करण्यात येत आहेत त्याचाच भाग म्हणुन यावल तालुक्यातील हंबर्डी गावात वैद्यकीय अधिकारी डॉ.अभिषेक ठाकुर यांनी माझे कुटुंब माझी जबाबदारी अभियान अंतर्गत सर्वेक्षणास प्रत्यक्ष उपस्थित राहुन ताप, सर्दी, खोकला यासरख्या करोना सदृश्य लक्षण आढळल्यास तात्काळ चाचणी करुन घेण्याकरीता घरोघरी जाऊन मार्गदर्शन केले. यावेळी त्यांच्यासमवेत डॉ. शहनाज तडवी, ग्रामसेवक बाळु वायकोळे, आरोग्य सेविका कामिनी किनगे, आरोग्य सेवक विलास महाजन, प्रकाश कोळी, आशा वर्कर्स, अंगणवाडी सेविका, मदतनीस उपस्थित व गावातील प्रतिष्ठीत नागरीक उपस्थित होते.
प्राथमिक लक्षणांमध्येच कोरोना चाचणी करुन घेतल्याने आपली प्रकृति अत्यावस्थेत जाण्याआधीच आपणास त्याचे निदान होते व त्यामुळे लवकर या आजारावर मात करण शक्य होत. त्याचप्रमाणे आपण कोरोना संक्रमित असण्याची शक्यता असतांना देखील लक्षण लपविल्यास, कोरोना आजाराचे संक्रमण आपण आपल्या घरातील लोकांना व आप्तेष्टांना देत असतो त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याकरीता स्वत:सोबतच आपल्या कुटंबीयांची देखील स्वयंस्फुर्तीने कोरोनाची चाचणी करुन घ्यावी असे आव्हाहन डॉ. अभिषेक ठाकुर यांनी यावेळी केले.
त्याचप्रमाणे सर्वेक्षणातील संशयित व्यक्तिंचे निदान होण्याकरीता डॉ.अभिषेक ठाकुर यांनी हंबर्डी गावातील 30-35 लोकांचे (आर.टी.पी.सी.आर.) घशाचे स्वैब घेतले, सदरील स्वैब घेण्याकरीता सी.एच.ओ. डॉ.शहनाज तडवी, आरोग्य सेविका कामिनी किनगे, आ.सेवक विलास महाजन, आशा वर्कर्स आदिंना सहकार्य केले.