पराग पाटील
(जळगाव शहर) – स्वा.सै.पं ध.थेपडे उच्च माध्यमिक विद्यालय म्हसावद, ता.जि.जळगाव येथे दि. २२ व २३ सप्टेंबर २०२० मंगळवार व बुधवार ह्या दोन दिवसांचे सत्रात लेखिका आपल्या भेटीला या ऑनलाइन शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.
पहिल्या दिवशीच्या सत्रात इ.१२ वी युवकभारती मराठी पाठ्य पुस्तकातील धडा वीरांना सलामीच्या सुप्रसिद्ध लेखिका अनुराधा प्रभुदेसाई यांनी विद्यार्थ्यांना भेट दिली व स्वतः विद्यार्थ्यांशी संवाद साधला त्या अनुषंगाने सैनिकांची शौर्यगाथा मांडतांना प्रत्यक्ष सीमेवरील परिस्थिती उभी केली व सैनिकांबद्दलचा आदर व सन्मान व्यक्त करण्यासाठी जय हिंदचा नारा दिला.
दुसऱ्या दिवशीच्या सत्रात इ. १२ वी अभ्यासक्रमातील कथा प्रकारात असलेल्या गढी कथेच्या सुप्रसिद्ध लेखिका डॉ. प्रतिमा इंगोले यांनी शिक्षकातला चांगुलपणा, खेड्यातील शेतकरी, मानुसकी, आदर्श गावची संकल्पना यांचे वर्णन प्रत्यक्ष विद्यार्थ्यांसमोर या परिसंवादातून उभे करून कथेच्या लेखनाची पार्श्वभूमी येथे स्पष्ट केली.
कार्यक्रमाचे प्रस्ताविक प्रा.निलेश पवार , लेखिका परिचय प्रा.योगराज चिंचोरे व प्रा. पराग पाटील यांनी केले तसेच आभार प्रा. समाधान श्री साळुंखे यांनी मानले. तर कार्यक्रमाला विद्यालयाचे मुख्याध्यापक, पी.डी.पाटील , उपमुख्याध्यापक डी. एस. खोडपे , जेष्ठ शिक्षक आर.व्ही.पाटील , कला शिक्षक श्री. पिंगळे , श्री.भंगाळे , श्री. बच्छाव , संजय पवार यांची उपस्थिती होती. कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रा.चव्हाण, प्रा.मगरे , प्रा.अमोल चौधरी , प्रा.सर्जेराव निकम, प्रा.श्रुती पाटील यांनी परिश्रम घेतले.
कार्यक्रमाला थेपडे ज्यू.कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी लेखिकांशी ऑनलाइन संवाद साधला व अशी ज्ञानाच्या पर्वणीची सुवर्ण संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल शिक्षकांचे आभार मानले.