जळगाव (प्रतिनिधी) – येथील जिल्हा परिषदेचे शंभरपेक्षा अधिक कर्मचारी अधिकारी हे कोरोना बाधित झालेले आहेत. यापैकी काही अजूनही उपचार घेत आहे. असे असूनही मात्र, जिल्हा परिषदेच्या जुन्या व नव्या इमारतीमध्ये निर्जंतुकीकरणाची कुठलीच व्यवस्था नसल्यामुळे धोकादायक झालेल्या जि.प. च्या दोघी इमारतीमध्ये कोरोनाचा धोका आणखी वाढलेला आहे.
जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग खालच्या मजल्यावर आहे. या विभागात देखील मुख्य अधिकाऱ्याशी अनेक कर्मचारी कोरोना बाधित झालेले आहेत मात्र, या विभागात येणाऱ्या लोकांना हात धुण्यासाठी सॅनिटायझर ठेवलेले नाहीत. तसेच इमारतीच्या प्रवेशद्वाराजवळ असलेले सॅनिटायझर स्टॅन्ड देखील नादुरुस्त स्थितीत आहे. त्यामुळे प्रत्येक विभागामध्ये सॅनिटायझर असावेत अशी मागणी जिल्हा परिषदेमध्ये येणाऱ्या नागरिकांकडून केली जात आहे.