जळगाव (प्रतिनिधी) – शहरातील रामेश्वर कॉलनी येथील रहिवासी महिलेला गर्भवती असतांना देखील घरगुती कामावरून विनाकारण वाद घालत पतीसह नणंद, नंदोईवर एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रामेश्वर कॉलोनी येथील २२ वर्षीय विवाहित पती व मुलगीसह भाड्याच्या घरात राहत आहे. २५ ऑगस्ट रोजी विवाहित महिला पती व मुलगीसह नणंद सुनीता भावसार यांच्या घरी श्राद्धाच्या कार्यक्रमाला गेली होती, त्यावेळी नणंद सुनीता हिने घरकामावरून भांडण केले.
गर्भवती असल्यामुळे काम जमत नाही असे विवाहित महिलेने सांगितले, तसेच तिने पतीला भांडणाची कल्पना दिली पण पतिने लाकडी दांडक्याने हातावर व पाठीवर मारहाण केली. तसेच नणंद, नंदोई यांनी देखील शिवीगाळ व मारहाण केल्याचे विवाहित महिलेने म्हंटले आहे.मारहाणी नंतर महिलेने डॉ. उल्हास पाटील रुग्णालयात उपचार घेतले. दरम्यान गर्भवती असल्याने तिने 3 सप्टेंबर रोजी मुलीला जन्म दिला. त्यानंतर बुधवारी 23 रोजी महिलेने फिर्याद दिली आहे. त्यानुसार पती सागर अशोक गायकवाड, नणंद सुनीता संतोष भावसार , नंदोई संतोष भावसार यांच्याविरुद्ध एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपस हेड कॉन्स्टेबल महेंद्रसिंग पाटील करीत आहे.