चाळीसगाव (प्रतिनिधी) सध्या कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे आरोग्यविषयक गंभीर समस्या निर्माण झाल्या आहेत जिल्ह्यांमध्ये कोरोना विषाणूंचा प्रसार रोखण्यासाठी मा. जिल्हाधिकारी सो यांनी प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा भाग म्हणून नागरिकांची एका ठिकाणी होणारी गर्दी टाळण्यासाठी सर्व शॉपिंग मॉल मधील सर्व दुकाने व अस्थापना (अत्यावशक किराणा, दूध ,भाजीपाला ,औषधालय व अन्य जीवनावश्यक वस्तू वगळून) जिल्हाधिकारी सो जळगाव यांनी आदेशित केले आहे त्यामुळे जिल्ह्यात सुरू असलेली ट्यूशन अभ्यासिका वरील अस्थापना पुढील आदेश येईपर्यंत दि. ३१ मार्च पर्यंत बंद ठेवण्याबाबत आदेश केलेला आहे.
सदर आदेशाचे काटेकोरपणे पालन करून विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जनतेने सहकार्य करावे असे महसूल व पोलीस प्रशासन तर्फे आवाहन करण्यात येते सदर आदेशाचे कोणत्याही व्यक्ती अथवा संस्थेने अवज्ञा केल्यास सदर बाब ही भारतीय दंड संहिता १८६०(४५)च्या कलम १८८ नुसार शिक्षेस पात्र असलेल्या अपराध केला असे मानण्यात येईल व पुढील कार्यवाही करण्यात येईल विजय ठाकुरवाड पोलीस निरीक्षक चाळीसगाव