नवी दिल्ली (वृत्तसंस्था) – केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी कोरोना विष्णूच्या युद्धात कोरोना वॉरियर्सच्या योगदानाचे अधोरेखित केले आहे. अमित शहा यांनी यासंदर्भात एक ट्विट केले आहे. त्यांनी ट्विटमध्ये लिहले आहे कि, ‘भारत कोरोना वॉरियर्सना सलाम करतो. मी तुम्हाला खात्री देतो की मोदी सरकार आणि संपूर्ण देश तुमच्या पाठीशी आहे.
Amit Shah
✔
@AmitShah
भारत अपने वीर कोरोना योद्धाओं को सलाम करता है। मैं आपको विश्वास दिलाता हूँ कि @narendramodi सरकार और पूरा देश आपके साथ खड़ा है।
देश को कोरोना से मुक्त कर हमें चुनौतियों को अवसर में बदलना है और एक स्वस्थ, समृद्ध व सशक्त भारत बनाकर विश्व में एक उदाहरण प्रस्तुत करना है।
जय हिंद!
View image on TwitterView image on TwitterView image on TwitterView image on Twitter
30.7K
12:34 PM – May 3, 2020
Twitter Ads info and privacy
6,446 people are talking about this
कोरोनाविरूद्ध काम करणारे डॉक्टर, पॅरामेडीक, पोलिस, सफाई कामगार कोरोना वॉरियर्स म्हटले जाते. पुढे त्यांनी लिहले आहे कि, आपल्याला आव्हानांना संधींमध्ये बदलून देशाला कोरोना विषाणूंपासून मुक्त करावे लागेल. तसेच निरोगी, समृद्ध आणि बलवान भारत निर्माण करून जगासमोर एक उदाहरण करायला हवं. जय हिंद.’ असं ट्विट त्यांनी केले आहे.
कोरोना विषाणूच्या साथीच्या विरूद्ध लढा म्हणून देशातील डॉक्टर, परिचारिका, आरोग्य कर्मचारी, पोलिस आणि सफाई कामगार यांनी पुढाकार घेतला आहे. या गंभीर परिस्थितीत, त्यांच्या परिवाराचा विचार न करता ते रात्रंदिवस लोकांच्या सेवेत गुंतले आहेत. रविवारी भारतीय सैन्य दलाने कोरोना वॉरियर्सना सलाम केला आहे. कोरोना रुग्णालयाजवळ सैन्य दलाने बॅन्ड वाजवले तर हवाई दलाने आकाशातून रुग्णालयांवर फुलांचा वर्षाव केला.
या बाबत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सैन्य दलाचे अभिनंदन केले. डॉक्टरांना, परिचारिकांनी आणि पोलिस कर्मचाऱ्यांनी दिवसरात्र काम करून देशाला प्राणघातक रोगराईपासून दूर ठेवण्यासाठी केलेले प्रयत्न आदर दाखवणारे आणि आनंददायी असल्याचे म्हटले आहे. कोरोनाबरोबरच्या युद्धात या योद्ध्यांचे धाडस नक्कीच वाखाणण्याजोगे आणि सन्माननीय असल्याचे गृहमंत्री म्हणाले.