नवी दिल्ली (वृत्तसंस्था) – माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी सांगितले कि, भारतात पत्रकारितेला पूर्ण स्वातंत्र्य आहे. देशातील पत्रकारांच्या स्वातंत्र्याबद्दल दुय्य्म प्रतिमा निर्माण करणाऱ्या सर्वेक्षणाचा भांडाफोड करण्यात येईल. जागतिक प्रेस स्वातंत्र्य दिनानिमित्त जावडेकर म्हणाले की, लोकांना माहिती देण्याचे आणि मार्गदर्शन करण्याचे सामर्थ्य माध्यमांमध्ये आहे.
Prakash Javadekar
✔
@PrakashJavdekar
मीडिया में बहुत ताकत होती है लोगों को जानकारी देने की और प्रबोधन करने की। भारत में सबसे अच्छी मीडिया फ्रीडम है। अनेक सर्वे ने भारत को निचा दिखाने की कोशिश की इसका जल्दी पर्दाफाश करेंगे।#WorldPressFreedomDay
10.5K
8:34 AM – May 3, 2020
Twitter Ads info and privacy
2,091 people are talking about this
आम्ही देशातील पत्रकारांच्या स्वातंत्र्याबद्दल वाईट प्रतिमा दर्शविण्याचा प्रयत्न केलेल्या सर्वेक्षणांचा लवकरच खुलासा करू, असं ट्विट त्यांनी केलं आहे. ग्लोबल प्रेस फ्रीडम इंडेक्समध्ये भारत दोन स्थानांनी घसरला आहे. स्वतंत्र पत्रकारितेची बाजू मांडणाऱ्या रिपोर्टर विथ बॉर्डर या संस्थेने यंदा जाहीर केलेल्या वार्षिक विश्लेषणामध्ये 180 देशांपैकी भारत 142 व्या क्रमांकावर आहे.
दरम्यान, जगातील पत्रकारितेच्या दिवशी काँग्रेसने भाजपवर आरोप केला आहे. भाजप पत्रकारितेची गळचेपी करत असुन, लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ नष्ट करण्याचा भाजपचा हेतू असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. काँग्रेसच्या अधिकृत ट्विटर हँडलवर म्हटले आहे की, वर्ल्ड प्रेस फ्रीडम इंडेक्समध्ये भारत दोन स्थानांनी घसरून 142 व्या स्थानावर गेला आहे. जेव्हा आपण जागतिक प्रेस स्वातंत्र्य दिन साजरा करताना हे लक्षात ठेवले पाहिजे की लोकशाहीचा हा चौथा स्तंभ नष्ट करण्याचा भाजपचा हेतू आहे. आपण असं होऊ देऊ नये. तसेच सर्व पत्रकारांनी घाबरू नये असं ट्विटमध्ये म्हटलं आहे.