पुणे (वृत्तसंस्था) – पुण्यात रात्रभरात 68 कोरोना बाधीत रुग्ण आढळले आहेत. तर काल दिवसभरात 4 जणांचा मृत्यू झाला आहे. पुणे शहरातील कोरोना बाधितांची संख्या 1800 वर पोहचली आहे. तर 103 जणांचा आत्ता पर्यंत यात मृत्यू झाला आहे. पुणेकरांसाठी ही चिंतेची बाब आहे. दिवसेंदिवस येथील रुग्णांमध्ये वाढ होताना दिसतेय. तसेच मृतांचा आकडाही वाढताना दिसतोय.
देशभरात लष्कराच्या वतीने सफाई कामगार डॉक्टर नर्स आणि कोरोना विषाणूच्य्या विरोधात लढणार्या सर्व योध्द्याना मानंवदाना देण्यात येत आहे.पुण्यात मनपाच्या आवारात लष्कराच्या दक्षीण कंमाडच्या वतीने सफाई कामगार नर्स आणि डॉक्टर याना मानवंदना देण्यात आली. या वेळेस पुण्याचे माहापौर आयुक्त उपस्थित होते.