नवी दिल्ली (वृत्तसंस्था) – उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सुरक्षा दलांमध्ये कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी विशेष खबरदारी घेण्याचे निर्देश अधिकाऱ्या दिले आहेत. रविवारी मुख्यमंत्री यांच्या शासकीय निवासस्थानी झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत राज्यातील लॉकडाऊनचा आढावा घेतला. त्यांनी बाहेरच्या राज्यातून येणाऱ्या गाड्यांमधून स्थलांतरितांच्या संदर्भात अतिरिक्त दक्षता घेण्याचे निर्देश पोलिस महासंचालकांना दिले आहेत.तसेच त्यांनी सुरक्षा दलात संसर्ग रोखण्यासाठी विशेष दक्षता घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. आणि कोरोना संदर्भात आवश्यक उपकरणांची व्यवस्था करण्यास सांगितले आहे.
CM Office, GoUP
✔
@CMOfficeUP
मुख्यमंत्री श्री @myogiadityanath जी ने अपने सरकारी आवास, लखनऊ पर #COVID19 वायरस संक्रमण से प्रभावित जनपदों के लिए तैनात किए गए नोडल अधिकारियों के साथ समीक्षा बैठक की।
View image on TwitterView image on TwitterView image on TwitterView image on Twitter
1,899
8:14 PM – May 2, 2020
Twitter Ads info and privacy
341 people are talking about this
लॉकडाउनच्या तिसऱ्या टप्प्यात ज्या उद्योगांना चालविण्यात येणार आहे त्यांचा कृती आराखडा तयार करण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत. ते म्हणाले की, बंदच्या वेळी राज्य सरकारने औद्योगिक उपक्रम राबविण्याबाबत माहिती जारी करावी. त्यांनी पायाभूत सुविधा व औद्योगिक विकास आयुक्तांना कामगार सुधारणांबाबत कृती आराखडा तयार करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच देखभाल भत्त्याची रक्कम लवकरात लवकर लाभार्थ्यांच्या बँक खात्यात हस्तांतरित करावी, असे निर्देश दिले आहेत.
स्वतंत्र अधिवास केंद्रे आणि सामुदायिक स्वयंपाकघराची निरंतर तपासणी करावी, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना दिले. प्रत्येक निवासस्थानात चांगले व पुरेसे भोजन दिले पाहिजे. असं मुख्यमंत्री म्हणाले. रूपे कार्डच्या वापरास प्रोत्साहन देण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. जन धन खातेदारांना रुपे कार्डचा वापर करून पैसे काढण्याचे आवाहन योगी यांनी केले. यामुळे बँकांमध्ये गर्दी होणार नाही तसेच कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यास मदत होईल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली