नवी दिल्ली (वृत्तसंस्था) – देशातील कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. आतापर्यंत कोरोनाबाधितांची संख्या 40 हजारावर गेली आहे. देशातील रुग्णांचा आकडा आता 39 हजार 980 वर गेला आहे. आत्तापर्यंत 10 हजार 663 कोरोना रुग्णांना डिस्चार्ज माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. आरोग्य मंत्रालयाने आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली. आतापर्यंत देशात 1301 लोकांचा मृत्यू झाला आहे.
राज्यात 3 मे नंतर लॉकडाऊन वाढवण्याच्या केंद्राच्या निर्णयाची राज्यात अंमलबजावणी करताना लॉकडाऊनमध्ये झोन निहाय शिथिलता देण्याचा निर्णय राज्य सरकारने आज घेतला आहे. त्यानुसार रेड झोनमधील मुंबई, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, पुणे महापालिका, पिंपरी चिंचवड महापालिका आणि मालेगाव महापालिका या क्षेत्रात मात्र लॉकडाऊनमध्ये कुठलीही शिथिलता देण्यात आलेली नाही.
जगभरातील 212 देशांमध्ये कोरोनाचा कहर सुरुच आहे. वर्ल्डोमीटरच्या आकडेवारीनुसार जीवघेण्या कोरोना व्हायरसमुळे आतापर्यंत मृत्यूंची संख्या जगभरात 2 लाख 44 हजारांवर पोहोचली आहे. कोरोना व्हायरसचा संसर्ग झालेल्यांची संख्या 34 लाख 80 हजार 492 हजारांवर पोहोचली आहे. जगभरात 11 लाख 8 हजार रुग्ण बरे झाले आहेत. मागील 24 तासात 82,398 नवीन कोरोनाबाधितांची भर पडली आहे तर 5,162 जणांचा मृत्यू झाला आहे.








