मुंबई (वृत्तसंस्था) – संपूर्ण देशामध्ये लॉकडाऊनची घोषणा होऊन जवळ जवळ आठ दिवस उलटले आहेत. संपुर्ण देश साध्या घरामध्ये आपल्या जवळच्या लोकांच्या सानिध्यात वावरत आहे. जुन्या आठवणी, जुने किस्से आता उजागर होताना दिसून येत आहे. मात्र रितेश देशमुख या सर्व गोष्टीच्या विपरत घरात भांडी घासत आहे. पत्नी जेनीलिया देशमुख हातात लाटन घेऊन रितेश वर पाळात ठेऊन तो व्यवस्थित काम करत आहेत की नाही हे पाहत आहे. तर रितेश मोका मिलेगा तो हम बता देगे अशा गाण्याने आपल्या भावना व्यक्त करत आहे. टिक टॉक वर यांचा हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होताना दिसून येत आहे.