जळगाव (प्रतिनिधी) – क्षेत्रीय रेलवे प्रशिक्षण संस्थान भुसावळ येथे राजभाषा विभागातर्फे दिनांक १४ ते २१ सप्टेंबरपर्यंत राजभाषा सप्ताह आयोजित करण्यात आला होता. या कालावधीत प्राचार्य क्षेत्रीय रेलवे प्रशिक्षण संस्थान, सप्ताहाचे उद्घाटन के.के. दाश यांनी केले. मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक यांचा हिंदी संदेश वाचून झाले.
या आठवड्यात निबंध, भाषण आणि टिप्पण आलेखन स्पर्धा आयोजित केल्या गेल्या. दि. २१ सप्टेंबर रोजी विजेत्यांना पुरस्कार देऊन राजभाषा सप्ताह मोठ्या उत्साहात संपन्न झाला. प्राचार्य व इतर अधिका्यांनीही राजभाषा विभागाच्या प्रयत्नांचे कौतुक केले आणि विजेत्यांचे अभिनंदन केले. या प्रसंगी प्राचार्य एस.के. दाश, संपर्क राजभाषा अधिकारी आणि सहाय्यक विभागीय विद्युत अभियंता के.के.सिंग, श्री.एस.एल. माणवतकर, बी.एन. सावरकरे, ओमप्रकाश आर.एस. उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन रितु कनौजिया यांनी केले.सुरेंद्र प्रसाद, सुरेंद्र प्रसाद ,लखन झा, महेद्र मरोड्कर, एस.एस. मानकर, वी.के.ठाकुर , उत्तम कुमार राय, जी.बी.गेबड़, एस.एस.खरे, एन.एन.सोनार, अजय कुमार झा यांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.