जि.प.सदस्यां पल्लवी सावकारे यांचा पत्रकार परिषदेत आरोप
गुन्हा दाखल करून चौकशीची मागणी
जळगाव (प्रतिनिधी) – जि.प.च्या अंतर्गत येणाऱ्या पाझर तलावाच्या कोट्यवधी रुपयाच्या गौण खनिजांच्या पावत्या असून त्या देण्यास अधिकाऱ्यांकडून टाळाटाळ केली जात आहे. गौण खनिजांची शासकिय अधिकाऱ्यांकडूनच हेराफेरी सुरू असल्याचे पुरावे जि.प.सदस्य पल्लवी सावकारे यांनी आज पत्रकार परिषदेत दिले.
कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार जिल्ह्यात झाला असुन चौकशी करण्याची मागणी जिल्हाधिकारी व मुख्यकार्यकारी अधिकारी यांच्याकडे करण्यात येणार आहे.
प्रामुख्याने जळगाव, भडगाव, पाचोरा अशा तालुक्यांत गौण खनिजविषयी मिळालेल्या कागदपत्रात प्रचंड घोळ दिसत आहे. एकच चालक एकचवेळेला विविध क्रमांकाचे ट्रॅक्टर घेऊन अनेक ठिकाणी वाळू वाहतूक करतो असे गमतीशीर प्रकरण देखील यात दिसून आले आहे. तसेच दुचाकी, तीनचाकी वाहनांना वाळू वाहतुकीसाठी दिलेल्या परवान्याबाबतही पल्लवी सावकारे यांनी साशंकता व्यक्त केली आहे. अनेक वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रॅकटरवर असणारी क्रमांक आरटीओ कार्यालयाकडे नोंदच नसल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
अनेक तालुक्यांमध्ये बोगस पावत्या तयार करून गौण खनिजांची लूटमार जिल्ह्यात सुरू आहे. तसेच पाचोरा तहसीलदार यांच्या नावाचे बोगस शिक्का बनवला असून तहसीलदार यांच्या नावाने बोगस सह्या कागदपत्रांवर आहेत. त्यामुळे देशद्रोहाचा देखील गुन्हा नोंद करून संबंधितांवर कडक कारवाई करण्याची मागणी जि.प.सदस्य पल्लवी सावकारे यांनी केली आहे.