जामनेर (प्रतिनिधी) – केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदीचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळं शेतकऱी वर्गामध्ये मात्र तीव्र संतापाची लाट आहे. कांदा उत्पादकांना याचा जबर फटका बसणार असल्यानं जामनेर तालुका शिवसेना व महाराष्ट्रातील शेतकरी संघटना याबाबतीत गंभीर झाल्याचे पाहायला मिळत आहे, या निर्णयाविरोधात जामनेर तालुका शिवसेनाने आंदोलन पुकारले आहे. याबाबत सोमवारी २१ रोजी तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.
केंद्रीय ग्राहक संरक्षण मंत्रालयाने सरकारला दिलेला कांदा निर्यातबंदीचा प्रस्ताव हा कोरोनाच्या संकटकाळात कांदा उत्पादक शेतकऱ्यांना नुकसानकारक आहे. निर्यात बंदीमुळे बाजारातील कांद्याच्या वाढत्या किमतीं गडगडल्या आहेत. केंद्र सरकारने केलेली निर्यात बंदी ही शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करणारी आहे. तरी केंद्र सरकारने या निर्यात बंदीचा निर्णय तात्काळ मागे घेवून शेतकऱ्याना दिलासा द्यावा अशी मागणी शिवसेनेने केली आहे. निर्यात बंदी न उठवल्यास शिवसेना स्टाईलने आंदोलन करण्यात येईल असा इशारा शिवसेनेने दिला आहे. निवेदन देतांना शहर प्रमुख पवन माळी, उपशहरप्रमुख काशिनाथ शिंदे, लालचंद चव्हाण, सुमित चव्हाण, विनोद नाईक, सुनील गायकवाड, दीपक माळी, किसान तंवर, अविनाश चव्हाण, योगिता बोराडे, लीलाबाई चिंचोले, संगीत सोनार, दीपक धुमाळे आदी उपस्थित होते.