जिल्हाधिकाऱ्यांना शेतकऱ्यांचे निवेदन
जळगाव (प्रतिनिधी) – राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण करतांना उच्च दाबाच्या वाहिन्यांसाठी नशिराबाद येथील शेतकर्यांची जमीन वापरण्यात आली होती. मात्र, शेतकऱ्यांना जमिनीच्या मोबदल्यापोटी शासनाकडून परतावा मिळालेला नाही. यासाठी शेतकर्यांना तातडीने मोबदला मिळावा म्हणून सोमवार दि. २१ रोजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष लालचंद पाटील यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकार्यांना निवेदन देण्यात आले.
निवेदनात असे म्हटले आहे की, मौजे नशिराबाद येथे राष्ट्रीय महामार्ग क्र. ६ च्या चौपदरीकरणाचे काम प्रगतीपथावर आहे. नशिराबाद – बोदवड रस्ता बायपास करण्यासाठी उडाणपुलचे काम सुरु असल्याच्या ठिकाणी त्या उड्डाणपुलाला अतिउच्चदाब विज वाहिनीही क्रॉस होत आहे. विज वाहिनी तात्रिकदृष्टया उंच व स्थलातर करण्याचे कार्य सुरु आहे. परतु, विज वाहिनी स्थलांतरित करतांना ठेकेदारने शासन निर्णयांचे उल्लंघन करून शेतकऱ्याकांडून ना-हरकत प्रमाणपत्र बनवून दिले आहेत. वास्तविक शासन निर्णयाच्या मुद्दा के – ३१ नुसार जिल्हाधिकारी स्तरावरुन समिती स्थापन करून सदर समितीने अतिउच्चदाब मनोऱ्याव्याप्त व वाहिनिच्या तारेखालील जमिनीची मोजणी करुन प्रस्तावाप्रमाणे मूल्यांकन करुन मोबदला निश्चित करावा असे स्पष्ट निर्देश शासन निर्णयामध्ये देण्यात आले आहेत.
अतिउच्चदाबाच्या मनोऱ्याचे व विज वाहिनीचे स्थलांतर करतांना संदर्भीय शासन निर्णयानुसार प्रकिया राबविण्यात यावी असे निर्देश संबंधित विभागाना देण्यात यावे. जेणेकरुन सबंधित शेतकऱ्यांना योग्य तो मोबदला मिळू शकेल, असेही निवेदनात म्हटले आहे. सदर विज वाहिनी स्थलांतराचे काम प्रत्यक्षात सुरु असल्याने माझ्या पत्राची लवकर दखल घेण्यात यावीत अशी मागणी जि. प. उपाध्यक्ष लालचंद पाटील यांनी केली आहे.