जळगाव (प्रतिनिधी) – जी.एम. फाऊंडेशन व युवाशक्ती फाऊंडेशनतर्फे जळगाव शहरात कोरोना स्मार्ट हेल्मेटने शहरातील नागरिकांचे पूर्ण शरीर थर्मल स्कॅन करण्यात येत आहे. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री श्री.उद्धव ठाकरे यांनी सुरु केलेल्या ‘माझे कुटुंब – माझी जबाबदारी” या अभियाना अंतर्गत सदर मोहीम राबविणायत येत आहे.
सदर हेल्मेट भारतीय जैन संघटना, पुणेतर्फे उपलब्ध करुन देण्यात आले आहे. हेल्मेटची किंमत सुमारे १५ लाख रुपये असून पुढील दोन आठवडे सदर मोहीम शहरात राबविण्यात येणार आहे. हेल्मेट हाताळण्यासाठी भारतीय जैन संघटना पुण्याचे चार स्वयंसेवक जळगावात आले आहे. भारतात असे फक्त चार हेल्मेट उपलब्ध आहे. एका मिनटात अंदाजे २०० लोकांची तपासणी सदर हेल्मवत करू शकतो.
याची सुरुवात पालकमंत्री गुलाबराव पाटील, माजी मंत्री गिरीश महाजन व जिल्हाधिकारी अभिजीतजी राऊत यांच्या उपस्थित करण्यात आली.
या वेळी महापौर भारती सोनवणे, आयुक्त सतीश कुलकर्णी, युवाशक्तीचे विराज कावडीया, सचिव अमित जगताप, जी.एम. फौंडेशनचे अरविंद देशमुख, माजी महापौर नितीन लढ्ढा, शिवसेना महानगरप्रमुख शरद तायडे, शिवसेना शहर संघटक दिनेश जगताप, माजी महापौर विष्णू भंगाळे, रामेश्वर नाईक, जितेंद्र छाजेड, पितांबर भावसार, इत्यादी उपस्थित होते.
शनिवार व रविवारी तुकारामवाडी, गणेशवाडी, जानकी नगर, मंजुषा हौसिंग सोसायटी, पंचमुखी हनुमान मंदिर परिसर या भागात दोन दिवसात १२३१२ जनाची स्कॅनिंग करण्यात आली आहे. या पैकी ४८ जण संशयित आढळून आले. त्यांना पुढील चाचणीसाठी पाठविण्यात आले आहे. पुढील चाचणी मनपाचे डॉक्टर संजय पाटील बघत आहे. शहरातील वर्दळीच्या ठिकाणी पुढील दिवसांमध्ये तपासणी करण्यात येणार आहे.
यशस्वीतेसाठी युवाशक्तीचे प्रीतम शिंदे, पियुष तिवारी, गणेश भोई, गोकुळ बारी, पियुष हसवाल, अमोल गोपाळ, सागर जगताप, राहुल शिंपी, भूषण माली, आकाश मराठे, इत्यादी परिश्रम घेत आहे.