नांद्रा प्रा.आ.केंद्रात आशासेविका यांना कोरोनाविषयी जनजागृती पत्रक वितरीत करतांना जि.प. सदस्य पदमबापु पाटील

पाचोरा (प्रतिनिधी) – कोरोना हा आजार नेमका काय ? त्याचे दुष्परीणाम कसे ? आणि त्याच्यातुन बचाव कसं केले जाईल ? याविषयी अनुभव व माहिती टिप्स सर्वसाधारण जनतेपर्यंत घरोघरी पोहचवुन त्यांना जनजागृती करायचे अभिनव असा अभियान कार्यसम्राट आमदार किशोरआप्पा पाटील यांनी कोरोनामुक्त होऊन घरी सुखरूप परतल्यानंतर सुरू केला आहे.

त्या अनुषंगाने कुरंगी-बांबरूड जि.प गटातील जि.प सदस्य पदमबापु पाटील यांनी आपल्या मतदारसंघातील नागरीकांची जनजागृती कोरोनाविषयी व्हावी यासाठी घरोघरी हे माहिती पत्रक पोहचावे यासाठी डाॅ.ज्ञानेश्वर सय्यासे व डाॅ.सागर सय्यासे यांच्या उपस्थितीत नांद्रा प्राथमिक आरोग्य केंद्रात आशासेविका यांना माहिती पत्रक वितरीत करण्यात आले.
यावेळी जि.प सदस्य पदमबापु पाटील यांना सर्दी जाणवत असल्याने व अनेक लोकांचे संपर्कात यावं लागत असल्याने त्यांनी स्वत:ची कोरोना रॅपिड टेस्ट करून घेतली व ती निगेटिव्ह आली. यावेळी कोरोनाला न घाबरता लक्षणं जाणवतं असलेल्या रूग्णांनी विशेष करून ५० पेक्षा वयाने जास्त ( मधुमेह, विविध आजार ग्रसित ) रूग्णांनी काळजी घ्यावी व स्वत:हुन पुढे येऊन आपली टेस्ट करून घेण्याचे नम्र आवाहन जि.प सदस्य पदमबापु पाटील यांनी केले आहे.







