पाचोरा (प्रतिनिधी) – पाचोरा -भडगाव मतदार संघात कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागात कोरोना ग्रस्त रुग्णांवर उपचारार्थ लागणारी साधनसामुग्री व आवश्यक साहित्य कमी पडू नयेे, यासाठी आ. किशोर पाटील हे प्रयत्नशील आहेत. नुकतेच त्यांनी आमदार निधीतून मतदार संघात सुमारे पंधरा लाखांच्या अँटी रॅपिडकिट जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.श्री.पोटोडे व तहसीलदार कैलास चावडे यांच्या उपस्थितीत तालुका आरोग्य अधिकारी डॉ. समाधान वाघ यांच्या स्वाधीन केले.
यावेळी आ. किशोर पाटील म्हणाले पाचोरा-भडगाव मतदार संघातील आरोग्य विभागासाठी आमदार निधीतून पन्नास लाखांच्या साहित्यांची खरेदी कोविड आजारात जोखमीचे कार्य करणारे डॉक्टर, नर्सेस, आरोग्यसेविका, कर्मचाऱ़्यांकरिता केली होती. त्या निधीतील उरलेल्या सुमारे पंधरालाख रूपयातून अँटी रॅपिड किट खरेदी करून पाचोरा- भडगाव मतदार संघासाठी सुपुर्द करीत आहे. जनतेने हा आजार टाळण्यासाठी कोणत्याही गर्दीच्या सार्वजनिक कार्यक्रम करू नये कींवा जाऊ नये. मास्क वापरावे, हात स्वच्छ धुणे, सॅनेटाईझरचा वापर आणि सोशल डिस्टनसिंगचे पालन करावे, असे आवाहन केले. खबरदारी घेतल्यास कोरोना घरात शिरणार नाही. या आजाराचे गांभीर्य नसलेले बहुतेक तरुण मास्क वापरतांना दिसून येत नाही. हा निष्काळजीपणा स्वत: सह आपल्या परिवारा करिता धोकादायक असल्याची खंत व्यक्त केली. या वेळी स्विय सहाय्यक राजेश पाटील, भरत खंडेलवाल उपस्थित होते.








