भडगाव (प्रतिनिधी) – महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून जळगाव जिल्हा युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रवींद्र नाना पाटील व पाचोरा भडगाव विधानसभेचे माजी आमदार दिलीप वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली भडगाव तालुका युवक अध्यक्ष स्वप्नील अमृत पाटील यांच्या हस्ते तालुक्यातील वाक येथे राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने. कोविड -१९ मध्ये काम करणारे कोरोना योद्धांचा सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला. यात पोलीस पाटील, सरपंच, उपसरपंच, सर्व ग्रामपंचायत सदस्य, अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा सेविका, आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, यांचा कोविड-१९ मध्ये कुठल्याही जीवाची पर्वा न करता उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने सर्व पदाधिकारी कर्मचाऱ्यांना सन्मानपत्र देऊन स्वागत करण्यात आले. त्याप्रसंगी सर्व गावातील कर्मचारी सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, गावातील जेष्ठ नागरिक, महिलावर्ग व तरुण बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.








