जळगाव (प्रतिनिधी) – शहरातील प्रभाग क्रमांक ३ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा सप्ताह साजरा करण्यात येत आहे. या सेवा सप्ताह अंतर्गत आज दिनांक २० सप्टेंबर रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराला भाजप कार्यकर्त्यांसह परिसरातील नागरिकांनी उत्स्फुर्त प्रतिसाद दिला.
याप्रसंगी प्रमुख जळगाव शहराचे आमदार राजू मामा भोळे, महापौर भारती सोनवणे, भाजपा महानगर अध्यक्ष दीपक सूयवंशी, स्थायी समिती सभापती ॲड. सुचिता हाडा, नगरसेविका रंजना सपकाळे, सामाजिक कार्यकर्ते भरत सपकाळे, नगरसेवक विशाल त्रिपाठी, नगरसेवक प्रवीण कोल्हे, डॉ. सूरज पाटील, शिक्षिका पूनम महाजन, सुभाष ठाकरे, कृष्णा सपकाळे, नंदा सपकाळे, बबलू कोळी, मनोहर पाटील, प्रदीप महाजन, प्रमोद माळी. अमृत पवार, गोपाळ सपकाळे, विकास सैंदाणे, महेंद्र कोळी, सोनु सरोदे, हरीश सोनार, शंकर रगडे., गोविंद सोनवणे, परशुराम साळुंखे यांची प्रमुख उपस्थिती होती.








