जळगाव-[ प्रतिनिधी ] – कांदा निर्यात बंदी उठवण्यासाठी राज्यव्यापी आंदोलनात शेतकरी हितासाठी केंद्र सरकारच्या विरुद्ध जळगाव जिल्हा युवक काँग्रेसने जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांना निवेदन दिले.
गेल्या पंधरवड्यापासूनच कांद्याच्या भावात थोडी वाढ होत होती म्हणून कांदे उत्पादक शेतकरी आनंदीत व समाधानी दिसून येत होते. हा आनंद जास्त काळ न टिकता अल्पावधितच शेकर्यांच्या पदरी निराशा आली. केंद्र सरकारने अचानक कांदा निर्यातीवर बंदी लावण्याचा तुघलकी निर्णय घेतल्याने कांदे उत्पादक शेतकरी संतप्त झाला असून हा निर्यात बंदीचा निर्णय तात्काळ मागे घ्यावा अशी मागणी कांदे उत्पादक शेतकरी यांच्यातर्फे जळगाव जिल्हाअध्यक्ष युवक काँग्रेस प्रा.हितेश सुभाष पाटील यांनी व उत्पादक शेतकर्यांनी केली आहे.

गेल्या तीन महिन्यापासून उन्हाळी हंगामातील कांद्याला भाव नसल्याने शेतकरी मोठ्या संकटात सापडले होते. म्हणून काही शेतकर्यांनी मातीमोल भावामध्ये कांदा विकून टाकला तर काही शेतकर्यांनी कांद्याला पुढे भाव मिळतील या आशेवर थांबत कांदा चाळमध्ये ठेवून मोठा खर्च केला आणि आता गेल्या पंधरवड्यापासून कांद्याला थोडी-थोडी वाढ होत गेली म्हणून मोठी आशा लागली होती आता याआठवडा भरापासून कांद्याला बरा भाव मिळत असतांना कांदा तेजीत येईल अशा आशा व कांद्यासाठी झालेला खर्च निघून हाती दोन पैसे मिळतील म्हणून शेतकर्याच्या आशा पल्लवीत झाल्या होत्या पण केंद्र सरकारने अचानक कांदा निर्यात बंदीचा एकतर्फी निर्णय घेऊन शेतकर्यांच्या आशेवर पाणी फेरुन आनंदाचा हीरमोड केला आहे. म्हणून केद्रंसरकारने तत्काळ निर्यात बंदीचा निर्णय मागे घ्यावा. शेतकर्याना कोविड 19 सारख्या महाभयंकर आजारात आपले योगदान दीले आहे तरी शेतकर्याना उचित न्याय द्यावा अशी मागणी जिल्हाध्यक्ष प्रा. हितेश पाटील यांनी केली आहे.







