वडती ता. चोपडा (प्रतिनिधी) – नुकताच दोन दिवसांपुर्वी घेण्यात आलेल्या निर्णयानुसार बुधवार बंदच्या निर्णयाला लहान-मोठ्या व्यवसायीकांनी शंभर टक्के पाठींबा देत सर्व दुकाने कडकडीत बंद ठेवल्याचे पहाण्यास मिळाले.


कोरोना बाधीतांची संख्या हि दिवसेंदिवस वाढतच दिसू लागल्याने. व्यापारी व ग्राहकांच्या सुरक्षेसाठी खबरदारीचा उपाय म्हणून हे गरजेचे होते. नेहमी पुर्वी प्रमाणे बाजारपेठ बुधवार बंद असायच्या त्याच नियमाला पुर्ववत करीत नव्याने बुधवारी बंद करण्याचा निर्णय व्यापारी मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला होता.
याच अनुषंगाने पहिल्याच सर्व शहरातील लहान – मोठे व्यवसायकांनी घेतलेला निर्णय अमलात आणून बुधवार रोजी बाजार पेेठेत पुर्णत: कडकडीत बंद ठेवला. संपुर्ण शहरात शुकशूकाट पहावयास मिळाला. बुधवारी बाजार पेठ बंद राहील याची माहीती तालुक्यातील जनतेस नसल्यामुळे अनेकांना रिकाम्या हाती घरी परत जावे लागले. या नव्या नियमाचे पालन छोटे-मोठे व्यवसायीक व व्यापा-यांकडून होत असल्याने व्यापारी वर्गाकडून देखील समाधान व्यक्त केले जात आहे. या सोबत मास्क न वापऱ्यांवर देखील कडक कारवाई केली जाताना पहावयास मिळाले.







