जळगाव तांबापुरात दोन गटात जोरदार दगडफेक
दोन जण जखमी ; एकास जण ताब्यात !
जळगाव (प्रतिनिधी )
शहरातील अतिसंवेदनशील भाग म्हणून ओळखले जाणारे तांबापुरा भागात किरकोळ कारणावरून दोन गटात जोरदार दगडफेक झाल्याची घटना आज शनिवारी सकाळी 8 वाजेच्या सुमारास घडली .या घटनेत दोन जण जखमी झाले आहेत तर एका जणांला पोलीसांनी ताब्यात घेतले असल्याचे समजते याबाबत एमआयडीसी पोलीस पुढील तपास करीत आहे.
जळगाव शहरातील तांबापुरा भागातील गवळी वाड्यातील एका घरात शुक्रवारी रात्री दारुपिऊन भोला नामक एक जण घुसल्यामुळे हा वाद चिघळला आहे. आज शनिवारी सकाळी 8 वाजता पुन्हा भोला हा दारुपिऊन गवळी वाड्यात जाऊन वाद घालु लागला यामुळे किरकोळ वादाचे पर्यावसन दगडफेकीत झाले. यात उखा खंडू हटकर वय 45 रा. गवळी वाडा तांबापुरा व भोला बावरी रा. तांबापुरा हे जखमी झाले आहे. आणि काही किरकोळ जखमी झाले आहे. घटनेची माहिती कळताच एमआयडीसी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विनायकराव लोकरे सह पी.एस आय. संदिप पाटील,साय्यक फौजदार अतुल वंजारी, गोविंदा पाटील ,अशोक सनकत,जितेंद्र राजपूत यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि मोठा अनर्थ टळला आहे.
दरम्यान घटनेची माहिती मिळताच पोलीस उपअधीक्षक निलभ रोहन मोठ्या फौज फाट्यासह घटनास्थळी दाखल झाले .काही वेळातच त्यांनी परिस्थिवर नियंत्रण मिळविले .दरम्यान या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.घटनास्थळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे .