पुणे (वृत्तसंस्था) – पिंपरी, पिंपरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत असणाऱ्या नेहरूनगर मध्ये रस्त्यावर उभा असलेल्या चार मोटारींच्या (कार) काचा अज्ञातांनी फोडल्या आहेत. यामुळे परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रस्त्यावर उभा असणाऱ्या चार मोटारींच्या काचा फोडण्यात आल्या आहेत. हा प्रकार भांडणातून झाला आहे की लुर्व वेमनस्यातून झाला आहे याचा शोध घेतला जात आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासून कारवाई केली जाणार आहे.
दरम्यान परिसरात चांगलीच भितीचे वातावरण पसरले आहे. दहशत माजवणाऱ्या टोळक्याने या परिसरात तोडफोड केली असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. तपास पिंपरी पोलीस करत आहेत.