
जळगाव (विशेष प्रतिनिधी) – आपल्या देशात नुकतीच नवीन शैक्षणिक प्रणाली येऊ घातली आहे. नवीन शैक्षणिक धोरणानुसार प्रादेशिक भाषे सोबतच त्या त्या भागातील बोली भाषेचा शिक्षणात समावेश करण्यात यावा अन्यथा जनआंदोलन करण्याचा इशारा आहीराणी भाषा संवर्धन परिषदतर्फे ,बापू हटकर, डॉ. सदाशिव सुर्यवंशी, विकास पाटील,प्रवीण जाधव यांनी दिला आहे. भाषा संवर्धन परिषदेतर्फे क्रांतीविरांगणा लिलाताई पाटील राज्य स्तरीय आहीराणी भाषा निबंध स्पर्धा नुकतीच संपन्न झाली.
या स्पर्धेत आहीराणी भाषेतील बरेच मान्यवर कवि,साहीत्यीक सहभागी झाले होते. हि स्पर्धा तिन वयोगटात विभागून वय वर्ष अकरा पासून सुरु होऊन पुढील वयाच्या सर्व मान्यवराना सहभागी होण्याची संधी आयोजकांनी उपलब्ध करून दिली होती. आहीराणी भाषेत उत्तम साहित्य आहे. या स्पर्धेत अनेक मान्यवर साहित्यिक,कवि,कांदबरीकार नाटकार या सर्वच मान्यवरांनी आहीराणी भाषेला प्रमाण भाषेचा दर्जा दिला जात नाही म्हणून आपल्या लिखाणातून खंत व्यक्त केली.
नवीन शैक्षणिक प्रणालीनुसार खान्देशातली बोली भाषाआहीराणी या भाषेस प्रमाण भाषेचा दर्जा देण्यात येवून प्राथमिक, माध्यमिक व महाविद्यालयीन शिक्षणात सामावेश करावा अन्यथा जनआद़ोलन उभारू असा इशारा प्रा.प्रकाश माळी व दिलिप सोनवणे यांनी दिला.
.कारण आहीराणी भाषेत खूप साहित्य तर आहेच तसेच बहिणाबाई चौधरी सारखे अलौकिक बुद्धिमत्ता लाभलेल्या कवियत्री त्यांचे साहित्य व अशी अनेकसाहित्य रत्न आहेत. लेखक ,कादंबरीकार ,नाटककार ,कवि यांचे सुध्दा मोठ साहित्य आहे व असे साहित्य निर्माण होत राहील .जर या भाषेला प्रमाण भाषेचा दर्जा मिळाला तर हे वृध्दिंगत होईल .नाही तर ही भाषा मरनासन्न आवस्थेत गेल्या शिवाय राहणार नाही. आपण आज विचार केला तर भारतातील भाषा कालबाह्य होण्याचे प्रमाण जगात सर्वात जास्त आहे. समाज मनाचा विचार केल्यास प्रमाणीत भाषा बोलणे हे सुशिक्षित पणाचे लक्षण मानले जाते तर बोली भाषा बोलणे हे अशिक्षित पणाचे लक्षण मानले जाते. पर्यायाने बोलीभाषा बोलण्याचा कल मंदावतो. तिची वाःडमयीन प्रक्रिया मंदावते व ति भाषा हळूहळू कालबाह्य होते. या सर्व विश्लेषणाचा सांगोपांग विचार विमर्श करावा व आहीराणी भाषेस प्रमाण भाषेचा दर्जा देण्यात यावा…..! अशी माहिती एन.एम.भामरे, ए.जी. पाटील ,विनोद शेलकर व सुभाष सरोदे यांनी दिली.
खान्देशातील अहिराणी भाषा ही प्रमुख भाषा असून धुळे, नंदुरबार ,जळगाव या जिल्ह्यात पूर्णपणे व नाशिक ,औरंगाबाद ,नगर जिल्ह्यातील काही भागात तसेच गुजरात राज्याला जोडलेली १५६ गावे व गुजरात राज्यातील सुरत ,उदना, सेलवास, वापी, बडोदा, सौराष्ट्र, कच्छ व भुजचा बराच भाग ,मध्य प्रदेशातील खेतिया, सेंधवा व पानसेमलचा परिसरपुणे,मुंबई,नविमुंबई व ठाणे या जिल्ह्यातील काही भागात अहिराणी भाषा बोलणारी लोकसंख्या आहे .जवळपास दोन कोटींपेक्षा अधिक लोकसंख्या अहिराणी भाषा व तिच्या १२ उपभाषेत बोलली जाते . तरी अहिराणी भाषा साहित्य व संस्कृती संवर्धन तथा वृद्धीसाठी या भाषेला प्रमाण भाषेचा दर्जा देवून शिक्षणात सामावेश करावा .अन्यथा आहीराणी भाषा कालबाह्य ह़ोईल अशी भिती श्री मगन सुर्यवंशी, प्रदिप आहीरे, दिपक पाटील ,किशोर पाटील यांनी व्यक्त केली आहे.आहीराणी भाषेस प्रमाण भाषेचा दर्जा देवून शिक्षणात सामावेश करावा अशी मागणी आहीराणी भाषा संवर्धन परिषदे मार्फत उत्तर महाराष्ट्रातील सर्व आमदार, खासदार, मंत्री,तसेच राज्याचे मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री, शिक्षण मंत्री, राज्यपाल,सांस्कृतिकमंत्री इ. मान्यवरांकडे करण्यात आली आहे.







