पुणे (वृत्तसंस्था) – मार्केट यार्डातील बाजार सुरळीत सुरू झाला आहे. सोमवारी फळ आणि कांदा बटाटा विभागात मिळून 243 वाहनांतून 12 हजार 361 क क्विंटल शेतीमालाची आवक झाल्याची माहिती बाजार समितीचे फळ विभाग प्रमुख बाबासाहेब बिबवे यांनी दिली.करोनाच्या पार्श्वभूमीवर रोटेशन पद्धतीने बाजार चालवण्यात येत आहे. रविवारी भाजीपाल्याचा व्यवहार झाला होता. तर, आज फळे आणि कांदा बटाटा विभाग सुरू होता. आज झालेल्या आवकेपैकी फळे आणि केळी विभागात मिळून 138 वाहनांमधून 5 हजार 857 क्विंटल मालाची आवक झाली. तर कांदा आणि बटाटा विभागात मिळून एकशे पाच वाहनातून 6 हजार 504 क्विंटल आवक झाली. याविषयी श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्ड ते असोसिएशनचे उपाध्यक्ष युवराज काची म्हणाले, फळ विभागात नेहमीच्या तुलनेत मालाला उठाव नव्हता. आलेल्या मालपैकी जवळपास निम्मा माल शिल्लक आहे. द्राक्ष वगळता सर्व फळांचे भाव स्थिर आहेत. तर, द्राक्षांच्या भावात मात्र मागणीअभावी घसरण झाली आहे.कांदा-बटाटा विभागाच्या व व्यवहाराविषयी आडते असोसिएशनचे उपाध्यक्ष राजेंद्र उर्फ आप्पा कोरपे म्हणाले, बाजार समितीच्या आवाहनाला प्रतिसाद देत कांदा-बटाटा विभागातील 70 टक्के आडते कामावर हजर झाले होते. येथील कामकाजात करोनाच्या भीतीमुळे कामगार कमी प्रमाणात सहभागी झाले. त्याचा परिणाम, कामावर झाला. अंदाजाने वजन ठरवुन व्यवहार करण्यात आले. घाऊक बाजारात सोमवारी कांद्यास किलोस 17 ते 20 रुपये, तर बटाट्यास किलोस दर्जानुसार 20 ते 20 रुपये भाव मिळाला.