पुणे (वृत्तसंस्था) – पुण्यामध्ये करोनामुळे पहिला बळी गेला आहे. करोनामुळे पुण्यात झालेला हा पहिलाच मृत्यू आहे. ५२ वर्षीय व्यक्तीवर शहरातील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. त्या व्यक्तीचा सोमवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला.महापालिकेच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे. या व्यक्तीला मधुमेह आणि उच्च रक्तदाबाचे विकार होते, अशी माहिती सूत्रांनी दिली.दरम्यान, राज्यातील करोना बाधितांचा आकडा सोमवारी आणखी वाढला आहे. राज्यात आणखी १२ करोनाग्रस्त रुग्ण सापडले आहेत. यात सर्वाधिक पुण्यातील आहेत. त्यापाठोपाठ मुंबईत तीन, नागपूरमधील दोन आणि कोल्हापूर व नाशिकमध्ये प्रत्येकी एक रुग्ण आढळून आला आहे.