मुंबई (वृत्तसंस्था) – देशात सहा दिवसापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉकडाऊन घोषित केला. त्यांच्या या घोषणेमुळे देशातील अनेकांचे काम बंद पडले. हाताला काम नसल्यामुळे प्रत्येक जण आपल्या गावी जाण्यासाठी धडपड आहे. त्यातही ही धडपड काही ठिकाणी जीवघेणी असल्याचे दिसत आहे. त्यामुळे अशा कामगारांसाठी पुढाकार घेतला असल्याचे दिसत आहे. करोनामुळे अचानक लॉकडाउनमुळे कामानिमित्त घराबाहेर आणि राज्याबाहेर असलेले अनेक कामगार होते त्या ठिकाणीच अडकून पडले. महाराष्ट्रात राज्याच्या सीमा बंद करण्याबरोबरच जिल्ह्याच्या सीमाही बंद करण्यात आल्या आहेत. त्यामुळे लपूनछपून अनेक जण घरी जात असल्याचं दिसून आलं. दरम्यान, कर्नाटकातील दोन हजार ४४२ कामगार मुंबईत अडकले होते. ते अखेर घरी परतले आहते. कर्नाटक सरकारनं पाठवलेल्या बसेसमधून कामगारांना घरी सोडण्यात आले आहे.