नवीदिल्ली (वृत्तसंस्था) – कोरोना व्हायरसचा धोका दिवसेंदिवस वाढत चालला आहे. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाला संबंधित करणार आहेत. भारतात आतापर्यंत कोरोना व्हायरसचे एकून 170 पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. तर तीन लोकांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. दरम्या नपंतप्रधान मोदी आज काय बोलणार याकडे सर्वांच्याच नजरा आहे. मोदी हे एखादी मोठी घोषणा करणार की, लोकांना घरात राहण्याचे अवाहन करणार की, एखादा महत्त्वाचा निर्णय घेणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.बुधवारी संध्याकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कोरोना व्हायरसवर मोठी बैठक घेतली. या बैठकीमध्ये वरिष्ठ अधिकारी सामिल झाले. या दरम्यान देशातील रुग्णालयांची व्यवस्था, सँपल चेकिंग सेंटर, सर्वच प्रवाशांविषयी चर्चा झाली. यानंतर पंतप्रधान कार्यालयाकडून सांगण्यात आले की, गुरुवारी रात्री 8 वाजता पंतप्रधान देशाला संबोधित करतील. यापूर्वी पंतप्रधान मोदींनी नोटबंदीच्या वेळी, स्पेस मिसाइल लॉन्च करतानाही देशाला संबंधित केले होते.