पुणे (वृत्तसंस्था) – दूरसंचार नियामक प्राधिकरण (ट्रायने) मोबाइल कंपन्यांना प्रीपेड ग्राहकांच्या वैद्यतेचा सध्याच्या काळात संपत असेल तर तो वाढवून देण्याचे आवाहन केले होते. याला मोबाइल कंपन्या प्रतिसाद देऊ लागल्या आहेत.भारती एअरटेल या मोबाइल सेवा पुरवठादार कंपनीने आपल्या 8 कोटी प्रीपेड ग्राहकांच्या सेवेची वैधता 17 एप्रिलपर्यंत वाढली आहे. त्याचबरोबर या खात्यामध्ये 10 रुपयाचा टॉक-टाइम दिला आहे. सध्याच्या परिस्थितीत ग्राहकांना मोबाइल चालू ठेवणे गरजेचे आहे. कारण त्यांना आपल्या नातेवाईकांशी संवाद साधण्याची गरज असते. ही बाब लक्षात घेऊन आम्ही हा पुढाकार घेतला असल्याचे एअरटेल कंपनीने जारी केलेल्या पत्रकात म्हटले आहे.बीएसएनएल आणि एमटीएनएल या कंपन्यांनी आपल्या प्रिपेड ग्राहकांच्या सेवा वैधतेचा कालावधी 20 एप्रिलपर्यंत वाढवून त्यांच्या खात्यात दहा रुपयाचा अतिरिक्त टॉक-टाइम दिला आहे.