औरंगाबाद (वृत्तसंस्था) – कोरोना व्हायरसने औरंगाबाद शहरात थैमान घातलं आहे. आज सकाळीच शहरात कोरोनाचे 23 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे शहरातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा आता 239 वर गेला आहे. दरम्यान आज आढळून आलेल्या रुग्णांमध्ये नूर कॉलनी 5, बैजीपुरा 11, कैलास नगर 3, समतानगर 2, जय भीम नगर 1 या भागात रुग्णांचा समावेश आहे.
तर शुक्रवारी शहरात नव्या 54 आणि रात्री उशीरा सात अशा 61 नव्या रुग्णांची वाढ झाली होती. सातत्याने शहरातील कोरोना रुग्णांमध्ये वाढ होत आहे. यामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण आहे.औरंगाबादकरांना चिंता वाढली आहे. दरम्यान आतापर्यंत एकूण 24 रुग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे. तर शहरात आतापर्यंत मृतांचा आकडा 8 वर गेला आहे.