नवी दिल्ली (वृत्तसंस्था) – माजी क्रिकेटपटू आणि भाजपचे खासदार गौतम गंभीर यांनी कोरोनाशी लढण्यासाठी पंतप्रधान मदतनिधीमध्ये आपले महत्वाचे योगदान दिले आहे. गौतम गंभीर यांनी आपले दोन वर्षांचे वेतन पंतप्रधान मदत निधीला (पीएम केअर्स फंड) देण्याचे गुरुवारी जाहीर केले. ट्विटरच्या माध्यमातून त्यांनी आपला निर्णय जाहीर केला.सध्या जगातील सर्वच देश कोरोनाशी मुकाबला करत आहेत. भारतातही कोरोनाचा वेगाने फैलाव होत आहे. देशात आता कोरोना बाधितांची संख्या १९०० च्या पुढे गेली आहे. त्याचवेळी ५० रुग्णांचा या आजारामुळे मृत्यू झाला आहे.