पुणे (वृत्तसंस्था) – कोरोनामुळे देशात सर्वत्र लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. दरम्यान, राजस्थानच्या कोटामध्ये राज्यातील विद्यार्थी अडकले होते त्यांना राज्य सरकारने परत आणले आहे. राजस्थानातील कोटा येथून पुण्यातील विद्यार्थ्यांना घेऊन शेवटची बस पुण्यात दाखल झाली. त्यामुळे इथे अडकून पडलेल्या पुण्यातील सर्व विद्यार्थ्यांची सुटका करण्यात आली आहे.
शुक्रवारी मध्यरात्री १२.३० वाजता स्वारगेट बसस्थानकात ही बस पोहोचली. या बसमधून पुण्यात दाखल झालेले एकूण ७४ विद्यार्थी आणि ८ चालक यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. यामध्ये कोणामध्येही करोनासंबंधित लक्षणे आढळून आली. तसेच कोणीही आजारी आढळले नाहीत. त्यामुळे या सर्वांच्या हातावर होम क्वारंटाइनचा शिक्का मारुन १४ दिवस घरातच राहण्याचा राहण्याचा सल्ला देत घरी पाठवण्यात आले.