मुंबई (वृत्तसंस्था) – सर एचएन रिलायन्स फाउंडेशन रूग्णालयामधून ऋषि कपूर यांचा शेवटच्या क्षणांचा व्हिडीओ लिक झाला होता. तो त्यांचा अंतिम व्हिडीओ असल्याचा दावा देखील सोशल माध्यमांवर केला जात आहे. त्यासंदर्भात रूग्णालयाने एक निवेदन जारी केले आहे. त्यामध्ये रूग्णालयाने अभिनेते ऋषी कपूर यांच्या सोशल मीडियावर लीक झालेल्या व्हिडीओची चौकशी करणार असल्याचे म्हटले आहे.
Ashoke Pandit
✔
@ashokepandit
@fwice_mum raises protest over viral video of #RishiKapoor ji in ICU at HN hospital.The video is unethical -without permission &violates fundamental right to live with dignity-privacy of a legend who lived a glorious & dignified life& loved ,regarded , held in high esteem by all.
View image on TwitterView image on Twitter
163
2:09 PM – May 1, 2020
Twitter Ads info and privacy
89 people are talking about this
रूग्णालयाच्या फेसबुकवरील अधिकृत पेजवर एक पोस्ट लिहिण्यात आली आहे. त्यामध्ये सर एच एन रिलायंस फाउंडेशन रूग्णालयाच्या मॅनेजमेंटचा एक संदेश. आयुष्यभरासाठी सन्मान. या पोस्टमध्ये पुढे लिहिण्यात आलं आहे की, ‘आम्हाला माहिती मिळाली आहे की, आमच्या रूग्णालयात दाखल असलेल्या एका रूग्णाचा एक व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल होत आहे.
सर एच एन रिलायंस फाउंडेशन रूग्णालयातील रूग्णांची गोपनियता आणि त्यांचं खासगी आयुष्य आमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे. आम्ही या व्हायरल होणाऱ्या व्हिडीओचा निषेध करत आहोत. रूग्णालयातील व्यवस्थापन या घटनेची चौकशी करणार आहे. तसेच या प्रकरणातील दोषींच्या विरोधात कठोर कारवाई करण्यात येणार आहे.
अभिनेते ऋषी कपूर यांचे गुरुवारी सकाळी निधन झाले आहे. ज्यानंतर त्यांच्या अंतिम क्षणांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यामुळे रूग्णालयाने सदर प्रकरणी चौकशी करून कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे.