मुंबई (वृत्तसंस्था) – धारावीत करोनाच्या रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतर आधीच आरोग्य विभागाची चिंता वाढली असताना आता अजून एक रुग्ण सापडला आहे. धारावीत एका सफाई कर्मचाऱ्याला करोनाची लागण झाली आहे. त्यामुळे आरोग्य विभागाची चिंतेत आहे. वरळी कोळीवाडय़ापाठोपाठ दाटीवाटीच्या धारावी परिसरात करोनाने शिरकाव केला असल्याने धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे हे आता आरोग्य यंत्रणांसमोर मोठं आव्हान असणार आहे. महापालिकेच्या ५२ वर्षीय सफाई कर्मचाऱ्याला करोनाची लागण झाली आहे. हा सफाई कर्मचारी वरळीचा रहिवासी आहे. धारावीत त्याला तैनात करण्यात आले होते. करोनाची लक्षणं आढळल्याने अधिकाऱ्यांना त्याला वैद्यकीय तपासणी करण्यास सांगितले होते. यावेळी त्याला करोनाची लागण झाली असल्याचे स्पष्ट झाले. वरळी कोळीवाडय़ापाठोपाठ दाटीवाटीच्या धारावी परिसरात करोनाने शिरकाव केला असल्याने धोका निर्माण झाला असून आरोग्य यंत्रणांसमोर मोठं आव्हान आहे. सध्या या सफाई कर्मचाऱ्याची प्रकृती स्थिर असल्याचे सांगितले जात आहे. या सफाई कर्मचाऱ्याच्या कुटुंब आणि सहकाऱ्यांना क्वारंटाइनचा सल्ला देण्यात आला आहे.