पुणे (वृत्तसंस्था) – खूनाच्या तीन दिवसानंतर आरोपी स्वतःहुन पोलीस ठाण्यात हजर झाला आणि त्यानंतर खुनाला वाचा फुटली आहे. प्राथमिक माहितीत किरकोळ कारणावरून कोथरूड येथील अक्षय कुलकर्णी या तरुणाचा खून करून त्याचा मृतदेह कचऱ्याच्या कुंडीत टाकून दिला.

अक्षय दिनेश कुलकर्णी (वय 22, कोथरूड) असे खून झालेल्याचे नाव आहे. संतोष चव्हाण (वय 24) तर असे खून करणाऱ्याचे नाव आहे. याप्रकरणी कोरेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अक्षय आणि संतोष यांना दत्तूचे तसेच गांजाचे व्यसन आहे. दरम्यान दोघांची ओळख होती. तीन दिवसांपूर्वी (दि. 26) वाद झाले. दोघे कोरेगाव पार्क येथील अल्पबचत भवनासमोरील रेल्वे पटरीच्या बाजूला साचलेल्या कचऱ्याजवळ होते. यावेळी झालेल्या वादातूनच संतोष याने अक्षयचा खून केला आणि तो पसार झाला. दरम्यान कचऱ्यात मृतदेह असल्याने तो कोणाला दिसला नाही आणि त्याबाबत काही समजले देखील नाही.
तीन दिवसानंतर म्हणजे आज आरोपी संतोष भल्या सकाळीच थेट कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात दाखल झाला आणि या खुनाची माहिती दिली. भल्या सकाळी एकजण येऊन खुनाबाबत सांगत असल्याने सर्वांचीच तारांबळ उडाली. तात्काळ महिला उपनिरीक्षक तुळे व त्याच्या पथकाने घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली असता मृतदेह मिळून आला. त्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान आरोपी भांडण झाले यामुळे मारले असे सांगत आहे. मात्र त्यांच्यावर कश्याने तरी वार केले आहेत. त्यामुळे आणखी आरोपी असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. त्याबाबत चौकशी सुरू असल्याचे सांगण्यात आले.







