नवी दिल्ली (वृत्तसंस्था) – सोन्याच्या किंमतीमध्ये आजही विक्रमी (Gold-Silver Price Today 29th June 2020) वाढ झाली आहे. जून महिन्यात तिसऱ्यांदा सोन्याच्या किंमतीमध्ये इतिहास वाढ झाली आहे. सोमवारी देशभरातील सराफा बाजारात 24 कॅरेट सोन्याचे दर 10 ग्रॅम 366 रुपयांनी वाढून 48600 रुपयांवर पोहोचले आहेत. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन (ibjarates.com) ची वेबसाइट सोन्या-चांदीची सरासरी किंमत अद्ययावत करत असते. त्यांच्यामते, 29 जून 2020 रोजी सोन्याच्या दरात विक्रमी वाढ झाली आहे.

कोरोनाची 3 नवी लक्षणं आली समोर, त्रास जाणवला तर तात्काळ करा COVID-19 टेस्ट
आज 23 कॅरेट सोन्याची किंमत प्रति दहा ग्रॅम 364 वाढून 48405 रुपये झाली आहे. तर 22 कॅरेट सोन्याची किंमत आता 336 वरून 44518 रुपयांना महाग झालं आहे. आणि 18 कॅरेटचे दहा ग्रॅमपर्यंत 36450 रुपये महाग झालं आहे. चांदीच्या दरातही 329 रुपयांची वाढ झाली आहे.







