नवी मुंबई (वृत्तसंस्था) – काँग्रेसने मोदी सरकार विरोधात ‘स्पीक अप इंडिया’ हे आंदोलनसुरु केलं आहे. राज्यात मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, अमरावती अशा ठिकाणी काँग्रेसचं आंदोलन झालं. सोशल मीडियावरही काँग्रेसने इंधन दरवाढीचा निषेध केलाय.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात पुण्यात सहभागी झाले होते. वाह रे मोदी तेरा खेल, सस्ती दारु मेहंगा पेट्रोल, असा फलक हाती घेत त्यांनी नारेबाजी केली आहे.
साताऱ्यात माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको करण्यात आला. आंदोलनात विश्वजित कदम यांच्यासह जिल्हयातील काँग्रेस कार्यकर्ते सहभागी झाले होते. तर सोलापूरमध्ये काँग्रेस भवनासमोर केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
दरम्यान, काँग्रेसने मोदी सरकार विरोधात देशव्यापी आंदोलन केलंय. राजधानी दिल्लीपासून मुंबई, पुणे, सातारा, अमरावतीत आंदोलन करण्यात येत आहे.







