औरंगाबाद (वृत्तसंस्था) – राजाबाजार कवठीचावाडा येथे आज सकाळी 6 च्या सुमारास रस्त्यातच अर्भक आढळून आले. यानंतर परिसरात एकच खळबळजनक उडाली. हे अर्भक पहाटे पहाटे कुणीतरी आणून टाकल्याची शक्यता आहे. या धक्कादायक घटनेमुळे परिसरात संताप व्यक्त करण्यात येत आहे. धक्कादायक म्हणजे अर्भकाचे नुसते शिर आढळून आले आहे. बाळाचे धड मात्र गायब आहे.
यानंतर नागरिकांनी ताबडतोब पोलीस व मनपा प्रशासनाला कळवल्याने पोलिसांनी तात्काळ पंचनामा करून हे अर्भक कुठून आले व कोणी आणून टाकले याचा शोध सुरू केला आहे. दरम्यान, आधीच कोरोनामुळे शहर हादरले असताना या घटनेमुळे कवठीचावाडा, राजाबाजार परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.