बुलडाणा (वृत्तसंस्था) – अवैध रेती वाहतूक करणाऱ्या टिप्परने जलंब पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी उमेश शिरसाठ यांना धडक दिली. यामध्ये शिरसाठ जागीच ठार झाले आहेत. या घटनेने पोलीस विभागात खळबळ उडाली आहे. आज पहाटे 4 वा दरम्यान ही घटना घडली. जलंब पोलीस स्टेशन हद्दीतील माटरगाव जवळ ही घटना घडली. पोलीस अधिकारी जलंब येथे दाखल झाले आहेत. या वाहनाचा शोध सुरू आहे.