जळगाव – भुसावळ शहरातील शनी मंदिर वार्डातील गणेश मंडळातील १५ जण हे मंगळवारी सायंकाळी ५ ते ६ वाजेच्या दरम्यान गणेश विसर्जनासाठी झेड.टी.सी.भागातील स्मशान भूमी समोरील रेल्वे पुलाखाली गेले असता चौघे पाण्यात बुडतांना दिसून आले, यापैकी दोघांना वाचविण्यात यश आले असून दोघे तरुण बेपत्ता झाले आहेत.

धीरज संजय शिंदे वय २१,किरण विश्वास मराठे वय २६ हे दोघांना वाचविण्यात आले आहे
सध्या दोघे खाजगी रिधम हॉस्पिटल मध्ये उपचार घेत आहे तर वैभव संजय शिंदे वय २०, उपेंद्र गुलाब चौधरी वय १९ राहणार शनी मंदिर भागातील असून दोघे तरुण बेपत्ता झाले असून शोध पथकाकडून दोघांचा शोध सुरू होता.







