मुंबई : सुशांत सिंह राजपूत आणि त्याची बहीण प्रियंका यांच्यामध्ये 8 जून रोजी झालेलं चॅट समोर आलं आहे. व्हॉट्सअॅपवर झालेल्या या चॅटमध्ये प्रियंका सुशांतला लिब्रियम कॅप्सूल एका आठवड्यासाठी बंद करुन नेक्सिटो 10 mg गोळी सकाळी नाश्त्यानंतर घेण्यास सांगत आहे. तसंच सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार प्रियंका सुशांतला लोनाझेप टॅबलेट सुद्धा इमर्जन्सीसाठी ठेवण्यास सांगत होती. जेणेकरुन एन्झायटीचा अटॅक जर आला तर त्यावेळी गोळ्या घेता येऊ शकतील.

या गोळ्या घेण्यासाठी डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनची गरज असते आणि ही गोष्ट जेव्हा सुशांतने प्रियंकाला सांगितली तेव्हा तिने सुशांतला आपल्या एका परिचित डॉक्टरकडून प्रिस्क्रिप्शन घेऊन देण्याचं सांगितलं. तसंच हे नामवंत डॉक्टर असून मुंबईतील त्यांच्या ओळखीच्या डॉक्टरांना भेटून त्यांचा सल्ला घेण्यास ही मदत करेल, असं प्रियंकाने सुशांतला सांगितलं.
प्रियंकाने ज्या गोळ्या सुशांतला घेण्यास सांगितला त्यामध्ये लिब्रियम, नेक्सिटो 10 mg, लोनाझेप या गोळ्यांचा समावेश आहे.
ही औषधं नेमकी का घेतली जातात?
लिब्रियम : लिब्रियम एक कृत्रिम निद्रा आणणारं औषध आहे. याचा उपयोग चिंता कमी करणे आणि एखाद्या व्यसनापासून जसं की दारु, ड्रग्स आणि इतर गोष्टींपासून लांब ठेवण्यासाठी केला जातो.
नेक्सिटो 10 mg : नेक्सिटो 10 मिलीग्राम टॅब्लेट उदासीनता आणि चिंता, पॅनिक डिसऑर्डर आणि वेड-बाध्यकारी डिसऑर्डरसारख्या इतर मानसिक आरोग्याच्या स्थितीवर उपचार करण्यासाठी लिहून दिले जाते. हा एक प्रकारचा अँटिडीप्रेससेंट आहे, ज्याला सेलेक्टिव्ह सेरोटोनिन रीपटेक इनहिबिटर (एसएसआरआय) म्हणून ओळखले जाते.
लोनाझेप टॅब्लेट : हे एक औषध आहे जे पॅनिक आणि चिंताग्रस्त डिसऑर्डरच्या उपचारांसाठी वापरले जाते.
मिळालेल्या माहितीनुसार डॉक्टर तरुण कुमार ज्यांनी हे प्रिस्क्रिप्शन दिलं ते दिल्लीतील राम मनोहर लोहिया रुग्णालयात डॉक्टर आहेत आणि राजपूत कुटुंबियांचे मित्र आहेत. सुशांतच्या तब्येतीबद्दल माहिती घेऊनच त्यांनी हे प्रिस्क्रिप्शन दिलं.
तर रियाच्या वकिलांनी हे चॅट समोर आल्यानंतर आणि प्रश्न निर्माण झाले आहेत. सुशांतचे कुटुंबीय सुरुवातीपासूनच आरोप करत होते की रिया सुशांतच्या गोळ्यांमध्ये बदल करते आणि त्यामुळे त्याच्या आरोग्यावर परिणाम झाला. मात्र या चॅटमुळे सुशांत ज्या गोळ्या घेत होता ते त्याच्या कुटुंबातील व्यक्तींनाच दिल्याचे स्पष्ट झालं आहे.
तसेच रियाच्या वकिलांनी स्पष्ट केलं की, प्रियंकाला 2019 पासूनच सुशांतच्या तब्येतीबद्दल माहिती होती. मेंटल हेल्थ ऍक्टप्रमाणे डॉक्टरने पेशंटला न तपासता या गोळ्या दिल्या आहेत आणि सुशांतचा opd पेशंट म्हणून उल्लेख केला आहे जे चुकीचं आहे. कोरोनाच्या महामारीदरम्यान ऑनलाईन कन्स्ल्टेशनला परवानगी होती, मात्र सुशांतच्या बाबतीत असं प्रिस्क्रिप्शन देणं योग्य नव्हतं.







