जळगाव (प्रतिनिधी) – रस्त्यावर विक्री करण्यात येणाऱ्या मास्कची खरेदी करताना अनेकदा नागरिकांकडून आवडीचा मास्क खरेदीचा प्रयत्न असताे. या वेळी एक-दाेन मास्क ताेंडाला लावून पाहिला जातो. परंतु हा प्रकार अनेक नागरिकांकडून हाेण्याची शक्यता असून, यातून काेराेना संसर्गाची भीती अधिक असते. सुज्ञ नागरिकांनी मास्कची खरेदी करताना आवडीपेक्षा स्वत:च्या सुरक्षिततेला प्राधान्य द्यावे, असे आवाहन केमिस्ट संघटनेने केले आहे.
शहरात रस्त्यावर ठिकठिकाणी मास्क विक्रेते हे वेगवेगळे मास्क घेऊन उभे आहेत. सुज्ञ नागरिकही त्यांच्याभोवती मास्क घेण्यासाठी गाेळा हाेत आहेत. वेगवेगळे मास्क लावून आरशात बघून आवडीच्या एका मास्कची निवड करीत आहेत. मास्क विक्रेता हा ग्राहकाने घालून पाहिलेला आणि न आवडलेला तो मास्क इतर मास्कमध्ये जागच्या जागी व्यवस्थित ठेवून देत आहे. तोच ठेवलेला मास्क दुसऱ्या कोणालाही सूट होतो. मास्क घेणारा व विकणारा दोघेही खूश होत आहेत. अर्थात, अशास्त्रीय व असुरक्षितरीतीने कोरोना विरुद्धच्या लढाईला सज्ज होत आहेत. याप्रकारे सुजाण नागरिक स्वतःहून कोरोनाला आपल्या घरी येण्याचे आमंत्रण नव्हे तर स्वतःच सोबत घरी नेत आहेत. कारण जे ग्राहक मास्क घालून बघतात व आवडला नाही म्हणून परत ठेवतात; परंतु न जाणो तो ग्राहक कोरोनाबाधित असला तर? आपल्या जीव धाेक्यात येऊ शकताे त्यामुळे काळजी घेणे गरजेचे आहे.
नागरिकांनाे, आज आपल्या जीवनात अविभाज्य असलेला घटक म्हणजे मास्कची खरेदी करताना काळजी घ्यावी. तसेच विश्वसनीय औषधी दुकानातूनच खरेदी करावी, असे आवाहन जिल्हा केमिस्ट संघटनेचे अध्यक्ष सुनील भंगाळे आणि सचिव अनिल झंवर यांनी प्रसिद्धीस दिलेल्या एका पत्रकाद्वारे कळवले आहे.