भुसावळ ( प्रतिनिधी) – शहरातील एका रेल्वे वसाहतीच्या परिसरात आई व मुलाचा घरात मृतदेह आढळून आल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली. या घटनेमुळे भुसावळात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आले.
पोलीसांकडून मिळालेली माहिती अशी की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोडवरील आरपीएफ बॅरकच्या बाजूला असलेल्या गंगोत्री कॉलनीत घडली. मृत फ्रॅन्सीस डॅनिअल (वय-५५) हा रेल्वेचा कर्मचारी होता. फ्रॅन्सीस डॅनियल आणि त्याची आई (पुर्ण माहित नाही) यांचा मृत्यू झाल्याने सकाळी परिसरात दुर्गधी पसरल्याने नागरीकांच्या लक्षात आला. घटनेची माहिती मिळताच शहर पोलीस ठाण्याचे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मरणाचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.