मुंबई (वृत्तसंस्था) – पोलिसनामा ऑनलाईन – कोरोना एक महामारी बनली आहे, जी रोखणे आता कठीण होत आहे. रोज कोरोनाची प्रकरणे वाढत आहेत आणि अनेक निरपराध लोकांचा जीव जात आहे. त्याचे संक्रमण दररोज वाढत आहे.

आपले सैनिक आणि पोलिसही कोरोना संक्रमित आढळले आहेत. महाराष्ट्र पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या २४ तासात १३१ पोलीस कोरोना व्हायरसने संक्रमित आढळले आहेत आणि दोघांचा मृत्यू झाला आहे. महाराष्ट्र पोलिसांमध्ये कोरोना संक्रमितांची संख्या २०९५ झाली आहे. त्यातील २२ पोलीस कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. तसेच ८९७ पोलीस कर्मचारी बरेही झाले आहेत, तर ११७८ पोलिस कर्मचारी अद्याप कोरोना संक्रमित आहेत.







