फैजपुर ( प्रतिनिधी) – शहरातील दुकानांसाठी नवीन नियमावली पालिका प्रशासनातर्फे जाहीर करण्यात आली असून यात कंटेनमेंट झोन वगळता बहुतांश बाजारपेठ सुरू होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

फैजपुरातील दुकानांसाठी पालिका प्रशासनाने नियमावली जाहीर केली असून यात प्रामुख्याने शहरातील तसेच इतर शहरातील कन्टेनमेंट झोन मधील रहिवाशी असणार्या व्यापार्यांना फैजपुर शहरातील त्यांचे दुकान उघडता येणार नाही. या नियमांचे पालन न केल्यास थेट कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे मुख्यधिकारी किशोर चव्हाण यांनी आदेश पारित केले आहेत. यामुळे काही व्यासायिकांना दिलासा मिळाला असला तरी तर काहींचा हिरमोड झाला आहे.
पालीका प्रशासनाच्या निर्देशांमध्ये नमूद करण्यात आले आहे की, कोरोना संसर्गजन्य आजार असल्याने त्याचाच एक भाग म्हणुन फैजपुर शहरात प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे आवश्यक आहे.







