• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

मीनल यांनी बनवलेल्या किटमुळे अवघ्या 1200 रुपयात कोविड 19 ची टेस्ट

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
March 28, 2020
in भारत, महाराष्ट्र
0

पुणे (वृत्तसंस्था) – देशात कोरोना चाचणींचं प्रमाणा आता मोठ्या प्रमाणात होणार आहे, कारण, कोरोना चाचणीचं किट्स पुण्यातील मायलॅब डिस्कव्हरी सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने विकसित केलं आहे. विशेष म्हणजे हे किट्सचा श्रेय एका मराठमोठ्या महिलेला जातं. खूप कमी वेळात आणि स्वस्तात हे किट्स विकसित करण्यात आले आहे. जगभरात असे किट्सचे उत्पादन करण्याची परवानगी केवळ नऊ कंपन्यांना आहे. त्यामध्ये भारतातील या एकमेव कंपनीचा समावेश आहे. या कंपनीकडून आत्ता दररोज दहा हजार किट्सची निर्मिती करण्यात येत आहे. आगामी काळात त्यामध्ये वाढ करून दररोज पंचवीस हजार किट्स तयार करण्यात येणार आहेत. कोरोना विषाणूची साथ महाराष्ट्रात पसरायला सुरुवात झाली तेव्हा मीनल डाखवे-भोसले ह्या साडेसात महिन्याच्या गर्भवती होत्या. कोरोना देशाच्या कानाकोपऱ्यात पसरायला सुरुवात झाली होती. पुरेशा टेस्टिंग लॅब नसल्यानं अडचण मोठी होती. त्यातही इंम्पोर्टेट किटमधून केलेल्या टेस्टचा रिझल्ट यायला 6 ते 7 तास लागायचे. त्यामुळे देशातील 118 लॅब्जवर जवळपास 130 कोटी जनतेचा भार होता. हीच अडचण ओळखून पिंपरी-चिंचवडच्या मायलॅबनं संशोधन सुरू केलं. तेही कोविड 19 च्या टेस्टिंग किटचं. त्याचं नेतृत्व करत होत्या मीनल.
कोविडसारख्या विषाणूच्या चाचण्या करणारी किट्स बनवायला एरवी 3 ते 4 महिने लागतात. पण मीनल यांनी हे किट अवघ्या सहा आठवड्यात बनवलं. ज्यावेळी मीनल किट्स बनवण्यात गुंतल्या होत्या, तेव्हा मानसिक आणि शारिरीक चॅलेंजही होतं. कारण त्यांच्या पोटात एक जीव वाढत होता. पण त्याची फिकीर न करता त्या संशोधन करत राहिल्या. अखेर बाळाच्या जन्माआधी एक दिवस आधी कोविड 19 ची टेस्ट करणारं किट जन्माला आलं. एका
मीनल यांनी बनवलेल्या किटमुळे अवघ्या 1200 रुपयात कोविड 19 ची टेस्ट होते. परदेशातून आयात केलेल्या किटच्या मदतीनं टेस्ट करायला 4500 रुपये लागतात. मीनल यांच्या किटमध्ये झालेल्या टेस्टचा रिझल्ट अवघ्या अडीच तासात येतो. परदेशातून आयात केलेलं किट टेस्टचा रिझल्ट द्यायला सहा ते सात तास घेतात. मीनल यांनी बनवलेलं किट एकाचवेळी 100 टेस्ट करण्याइतकं सक्षम आहे. मायलॅबनं तयार केलेल्या किटला आयसीएमआरनं मान्यता दिलीय. भारतीय कंपनीनं तयार केलेलं आणि 100 टक्के अचूक रिझल्ट देणारं एकमेव किट असल्याचंही आयसीएमआरनं म्हटलंय.


 

 

Previous Post

सुरतहून यवतमाळला जाणारे 14 जण ताब्यात

Next Post

आपापल्या गावात जाण्यासाठी पायपीट करणाऱ्या मजूराना मदत पुरवा

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

आपापल्या गावात जाण्यासाठी पायपीट करणाऱ्या मजूराना मदत पुरवा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

NHAI कंत्राटदार कंपनीवर अखेर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा
1xbet russia

NHAI कंत्राटदार कंपनीवर अखेर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा

September 1, 2026
तवेरा-ट्रक धडकेत रावेरच्या शेतमजुराचा मृत्यू; अपघातात चौघे गंभीर जखमी
1xbet russia

तवेरा-ट्रक धडकेत रावेरच्या शेतमजुराचा मृत्यू; अपघातात चौघे गंभीर जखमी

September 1, 2026
विशेष सखोल पुनरिक्षणांतर्गत प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध
1xbet russia

विशेष सखोल पुनरिक्षणांतर्गत प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध

August 31, 2026
रामेश्वर कॉलनीतील ३१ लाखांची घरफोडी २४ तासांत उघड! दोन सख्ख्या भावांना बेड्या
1xbet russia

रामेश्वर कॉलनीतील ३१ लाखांची घरफोडी २४ तासांत उघड! दोन सख्ख्या भावांना बेड्या

August 31, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

NHAI कंत्राटदार कंपनीवर अखेर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा

NHAI कंत्राटदार कंपनीवर अखेर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा

September 1, 2026
तवेरा-ट्रक धडकेत रावेरच्या शेतमजुराचा मृत्यू; अपघातात चौघे गंभीर जखमी

तवेरा-ट्रक धडकेत रावेरच्या शेतमजुराचा मृत्यू; अपघातात चौघे गंभीर जखमी

September 1, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon